|Thursday, June 27, 2019
You are here: Home » leadingnews » गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर अनंतात विलीन

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर अनंतात विलीन 

ऑनलाईन टीम / पणजी :

गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकरांच्या अंत्यविधीला सुरुवात झाली आहे. लष्करी इतमामात पर्रीकराना अखेरचा निरोप देण्यात येत आहे. कॅपल येथील एसएजी मैदानावर आपल्या लाडक्मया नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला आहे. ‘मनोहर भाई अमर रहे..’च्या घोषणा दिल्या जात आहेत. लढवय्या नेता हरपला, असल्याची भावना उपस्थितांकडून व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, मनोहर पर्रीकर यांची रविवारी सायंकाळी 6 वाजून 40 मिनिटांला प्राणज्योत मालवली. ते स्वादुपिंडाच्या कर्करोगाने (पँक्रियाटिक कॅन्सर) ग्रस्त होते. मनोहर पर्रीकरांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी काही काळ भाजप कार्यालय आणण्यात आले होते. नंतर त्यांचे पार्थिव कला अकादमीत ठेवण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यात पोहोचून पर्रीकरांना श्रद्धांजली अर्पण केली.