|Sunday, April 21, 2019
You are here: Home » Top News » हार्दिक पटेल झाले ‘बेरोजगार’, मोदींच्या ‘मैं भी चौकीदार’ला उत्तर

हार्दिक पटेल झाले ‘बेरोजगार’, मोदींच्या ‘मैं भी चौकीदार’ला उत्तर 

ऑनलाईन टीम /  मुंबई : 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्या ‘चौकीदार चोर है’ या घोषणेचा धसका घेत ‘मैं भी चौकीदार’ ही मोहिम उघडली आहे. नरेंद्र मोदींच्या या मोहिमेला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी ट्विटरवर आपल्या नावापुढे ‘चौकीदार’ असे  आहे. मात्र गुजरातचे पाटीदार समाजाचे नेते आणि नुकतेच काँग्रेसमध्ये सामील झालेले हार्दिक पटेल यांनी ‘चौकीदार’ शब्दाला टक्कर देत ट्विटरवर आपल्या नावापुढे ‘बेरोजगार’ असे लिहिले.

त्यामुळे ट्विटरवर हार्दिक पटेल यांच नाव आता ‘बेरोजगार’ हार्दिक पटेल असे झाले आहे. हार्दिक पटेल यांच्या या मोहिमेची ट्विटरवर जोरदार चर्चा सुरु आहे. राफेल कराराच्या मुद्यावरुन राहुल गांधी आणि काँग्रेस सातत्याने पतंप्रधान नरेंद्र मोदींवर ‘चौकीदार चोर है’ असे म्हणत हल्लाबोल करत आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदींनी शनिवारी सोशल मीडियावर मैं भी चौकीदार ही मोहीम उघडली होती. काही तासातच ‘मैं भी चौकीदार’ हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होत होता. तसेच इतर सोशल मीडियावरही या मोहीमेची चर्चा होती. मोदींसह देशातील दिग्गज भाजप नेत्यांनी ट्विटरवर आल्या नावापुढे ‘चौकीदार’ लिहिले होते.

Related posts: