|Thursday, June 27, 2019
You are here: Home » Top News » इंडोनेशियातील पापुआमध्ये पूराचा हाहाकार, 79 जणांचा मृत्यू

इंडोनेशियातील पापुआमध्ये पूराचा हाहाकार, 79 जणांचा मृत्यू 

ऑनलाईन टीम /  पापुआ :

 इंडोनेशियाच्या पापुआ भागात अचानक आलेल्या महापुरामुळे 79 जणांचा मृत्यू झाला आहे. आपत्कालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी जयपुरा जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांना भेटी दिल्या. पूर आणि भूस्खलनामुळे 116 जण जखमी झाले असून त्यातील 41 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती दिली. पूरामुळे अनेक जिल्ह्यांना फटका या आपत्तीमध्ये मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. कारण अनेक जण अजूनही बेपत्ता असल्याचे  अधिका-यांनी सांगितले. 

मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी जयपूरा जिल्ह्यातील अनेक गावांना पूराचा फटका बसला आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून जयपुरा भागात पावसाला सुरुवात झाली होती. या परिसारतील घरे, रस्ते, पूल आणि इतर ठिकाणांना पूरामुळे मोठे नुकसान झाले आहे.  राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रवक्ते पुर्वी नुग्रोहो यांनी सांगितले,  आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी पुरामध्ये बेपत्ता असलेल्या लोकांचा शोध घेण्याचे काम करत आहे. आत्तापर्यंत 4 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे. पूरामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याच्या घटना घडल्या आहेत. सध्या पूरातील पाण्याची पातळी कमी होत असली तरी नागरिकांच्या सुरक्षेचे मोठे आव्हान आमच्या समोर आहे. पूरामुळे अनेक भागात घरे पडली आहेत, झाडे कोसळली आहेत, रस्त्यावर चिखल झालेला आहे. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत आहे.