|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » Top News » बिनधास्त भाजपामध्ये जा, आम्ही पाठीशी आहोत, मोहिते-पाटील पितापुत्रांना कार्यकर्त्यांची ग्वाही

बिनधास्त भाजपामध्ये जा, आम्ही पाठीशी आहोत, मोहिते-पाटील पितापुत्रांना कार्यकर्त्यांची ग्वाही 

ऑनलाईन टीम / सोलापूर :

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना माढ्यात मोठा धक्का बसण्याची शक्मयता आहे. राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्मयता आहे. विशेष म्हणजे कार्यकर्त्यांनीही त्यांना बिनधास्त भाजपमध्ये जाण्याचा सल्ला दिला.

अकलूजमध्ये मोहिते-पाटील पितापुत्रांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या मेळाव्यातच मोहिते-पाटील पितापुत्रांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे. जवळपास पाच हजार कार्यकर्त्यांनी मेळाव्याला हजेरी लावली होती. उपस्थित कार्यकर्त्यांनी मोहिते पाटलांना बिनधास्तपणे भाजपमध्ये जाण्याचा सल्ला दिला. तुम्ही फक्त निर्णय घ्या, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असा विश्वास कार्यकर्त्यांनी मोहिते पाटलांना दिला.