|Monday, June 24, 2019
You are here: Home » leadingnews » रणजितसिंह मोहिते-पाटील उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार

रणजितसिंह मोहिते-पाटील उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार 

 

 ऑनलाईन टीम/ सोलापूर: 

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर रणजितसिंह मोहिते-पाटील हे उद्या  दुपारी 12.30 वाजता भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. रणजितसिंह यांच्या भूमिकेला त्यांचे वडील विजयसिंह मोहिते पाटील यांनी पाठिंबा दर्शविला आहे. यामुळे माढय़ामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे.

अकलूजमध्ये मोहिते-पाटीला पिता-पुत्रांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी ही घोषणा केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघात माघार घेतल्यानंतरही माढाचा तिढा सुटण्याचं नाव घेत नाहीए. राष्ट्रवादीनं जाहीर केलेल्या दोन्ही उमेदवार याद्यांमध्ये माढाचं नाव नसल्यानं अस्वस्थ झालेल्या रणजितसिंह यांनी भाजपमध्ये जाण्याची तयारी केली होती.

राष्ट्रवादीला याची कुणकुण लागल्यानं पक्षाच्या पहिल्या दोन उमेदवार याद्यांमधून माढाला वगळण्यात आलं. मोहिते-पाटलांना एकप्रकारे हा संदेश असल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर वेगवान घडामोडी सुरू झाल्या असून मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचं जवळपास निश्चित केले होते. मंगळवारी यावर शिक्कामोर्तब झाला. बुधवारी मुंबईत ते भाजपमध्ये प्रवेश करतील.