|Monday, June 24, 2019
You are here: Home » leadingnews » ही निवडणूक म्हणजे मोदी-शहा विरुद्ध देश

ही निवडणूक म्हणजे मोदी-शहा विरुद्ध देश 

 

 

ऑनलाईन टीम/ मुंबई: 

देशाच्या नवीन सुरुवातीकरिता नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे राजकीय पटलावरून दूर गेले पाहिजेत. याकरिता सर्वांनी एकत्र आले पाहिजेत. यापुढे सगळे भाजपाविरोधी करायचे. यापुढील माझी भाषणेही भाजपाविरोधी असतील. यांच्याविरोधात प्रचार झाला पाहिजे. याचा फायदा कोणाला व्हायचा तो होऊ देत. पण, मोदीमुक्त भारत झाला पाहिजे, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे मंगळवारी यांनी ठणकावून सांगितले. दरम्यान, विधानसभेच्या तयारीला लागा, असा आदेशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राज ठाकरे म्हणाले, देश आज धोक्यात आहेत. मोदी आणि शहा हे राजकीय पटलावरून दूर झाले पाहिजेत. आता काय चौकीदार, भारतातल्या निवडणूका लढवताय की नेपाळच्या, असा सवालही त्यांनी केला. पंतप्रधान एवढय़ा खालच्या विचारांचा असेल असे वाटले नाही. काय तर म्हण चौकीदार, या भानगडीत पडू नका. ही मोहीम ट्रप आहे. गेल्या साडे चार वर्षातील अपयश झाकण्यासाठी हे सुरु केले आहे. ही निवडणूक पक्षाची नाही. भाजप पक्ष म्हणून अंतर्गत खूप त्रस्त आहे. ही दोन माणसे जेव्हा बाजूला होतील त्यानंतरची लढाई ही खरी पक्षांमधील असेल.

राष्ट्रवादीसोबत जाणार असल्याच्या अजित पवारांच्या वक्तव्यावर त्यांना फोन करून विचारले कुठे भेटुयात; भेटलो आणि जाब विचारला. तुम्हाला कधी भेटलो, पक्षाचा कोणता नेता बोलला का? कधी सीट मागितल्या का? नाही म्हणाले. यानंतर अशोक चव्हाणांनाही विचारले. जर नाही तर मग तुम्ही माध्यमांसमोर का बोलत सुटलात? असा सवाल विचारल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणजे हवा गेलेला फुगा

मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करताना राज यांची स्क्रिप्ट ही बारामतीमधून येते असे म्हटले होते. मुख्यमंत्री म्हणजे हवा गेलेला फुगा आहेत, असे म्हणत आपल्या खास शैलीत राज ठाकरे यांनी शेलक्या शब्दात टीका केली.

एअरस्ट्राईकबद्दल खोटी माहिती पसरविली जात आहे

युद्ध करायला पैसे लागतात. सरकारच रिझर्व्ह बँकेकडे पैसे मागत आहे. तर युद्ध कुठून करणार. एअरर्स्ट्राकबद्दल खोटी माहिती पसरवली जात आहे. खोटय़ा फोटोंचा वापर करत खोटा प्रचार केला जात आहे. पुलावाम्याच्या घटनेवरुन आपल्याला मते मिळणार नाहीत, हे मोदींना कळले आहे, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.