|Monday, June 24, 2019
You are here: Home » Top News » विजयसिंह मोहिते-पाटील राष्ट्रवादी सोडणार नाही, सुनील तटकरेंचा विश्वास

विजयसिंह मोहिते-पाटील राष्ट्रवादी सोडणार नाही, सुनील तटकरेंचा विश्वास 

ऑनलाईन टीम / पंढरपूर : 

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते, विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील हे पक्षावर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मुलगा रणजीतसिंह मोहिते पाटलांप्रमाणे तेही पक्ष सोडून जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीचे वजनदार आणि समंजस नेते आहेत. त्यामुळे ते राष्ट्रवादी सोडून जाणार नाहीत, असा विश्वास राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंनी व्यक्त केला आहे.

नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढणे ही ज्येष्ठ नेत्यांची जबाबदारी असते आणि विजयसिंह मोहिते पाटील कार्यकर्त्यांची समजूत काढून पक्षातच राहतील, असं तटकरे यांनी सांगितले. आमच्या सारख्या अनेक तरुण नेत्यांनी मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले आहे. विजयसिंह मोहिते पाटील रणजीतचीही समजूत काढतील, असे  सुनील तटकरेंनी म्हटले. विजयसिंह मोहिते पाटलांवर अन्याय होत आहे का याबाबत आपल्याला काहीही कल्पना नाही. मी सध्या रायगडाच्या निवडणुकीत व्यस्त असल्याने मोहिते पाटील यांच्या निर्णयाबाबत आपल्याला काहीच माहित नसल्याचेही तटकरे यानी सांगितले.