|Monday, June 24, 2019
You are here: Home » Top News » राज ठाकरे आज पुन्हा शरद पवारांच्या भेटीला

राज ठाकरे आज पुन्हा शरद पवारांच्या भेटीला 

 

ऑनलाईन प्रतिनिधी / मुंबई :

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना हटवण्यासाठी प्रचार करा, असे आदेश काल दिल्यानंतर आज लगेचच मनसेप्रमुख राज ठाकरे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या भेटीला गेल्यानं राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. राज यांनी पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी त्यांची भेट घेतली. या भेटीत विविध राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाली. राज आणि पवार यांची गेल्या काही महिन्यांपासूनची वाढती जवळीक चर्चेचा विषय ठरली आहे. काल राज ठाकरेंनी जाहीर सभा घेत पंतप्रधान मोदी आणि आणिभाजपा अध्यक्ष अमित शहांवर शरसंधान साधलं. या देशाची नवी सुरुवात होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी दोन माणसं राजकीय पटलावरून बाजूला होणं आवश्यक आहे. त्यामुळे यांच्याविरोधात प्रचार करा. फायदा व्हायचा त्यांना होऊ दे, असे आदेश काल राज यांनी यांनीमनसे कार्यकर्त्यांना दिले. ’यंदाची निवडणूक मोदी आणि शहा विरुद्ध देश अशी आहे. कोण काँग्रेसचा, कोण राष्ट्रवादीचा याच्याशी कर्तव्यच नाही. मोदीमुक्त भारत झाला पाहिजे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे आणि हे मी गुढीपाडव्याच्या सभेतच सांगितलं होतं,’ असं राज यांनी म्हटलं होतं.