|Monday, June 24, 2019
You are here: Home » Top News » पुण्यात 20 ते 25 वाहने पेटली

पुण्यात 20 ते 25 वाहने पेटली 

ऑनलाईन टीम / पुणे :

पुण्यातील शिंदेवाडी येथील एका गॅरेजसमोर उभ्या असलेल्या चार ते पाच खासगी बससह 20 ते 25 वाहनांना भीषण आग लागल्याची घटना आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 2 बंब आणि एक पाण्याचा टँकर घटनास्थळी पोहचला आहे. तासभर शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्मयात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.

शिंदेवाडी येथील एका गॅरेजसमोर खासगी बससह काही वाहने उभी होती. सकाळी या वाहनांना भीषण आग लागली. चार ते पाच खासगी बससह 20 ते 25 वाहनांना आग लागल्याचे स्थानिक नागरिक आणि प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात येते. परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब आणि पाण्याचा टँकर घटनास्थळी पाठवला. तासभर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर सव्वाअकराच्या सुमारास आग आटोक्मयात आणली. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.