|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » leadingnews » कर्जबुडव्या नीरव मोदीला लंडनमधून अटक

कर्जबुडव्या नीरव मोदीला लंडनमधून अटक 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पिएनबी बँकेला 14 हजार कोटींचा चुना लाऊन फरार झालेल्या उद्योगपती नीरव मोदीला लंडनमधून अटक करण्यात आली आहे. थोडय़ाच वेळात नीरव मोदीला लंडन कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

सीबीआयने इंटरपोल आणि ब्रिटिश प्रशासनाशी संपर्क करून फरार नीरव मोदीविरोधत लागू करण्यात आलेल्या रेड कॉर्नर नोटीसवर कारवाई करत अटक करण्याची मागणी केली होती. तपास यंत्रणेने दीर्घ कालावधीपासून नीरव मोदीविरोधत ब्रिटनकडे प्रत्यार्पणाची अधिकृत मागणी जुलै-ऑगस्टमध्ये केली होती.नीरव मोदी सध्या लंडनमध्ये एषोअरामी जीवन जगत होता. तो लंडनमधील वेस्ट एंड परिसरातील सुमारे 73 कोटी रूपये किंमत असलेल्या अर्पाटमेंटमध्ये राहत असल्याचे सांगण्यात येते. नुकताच त्याला माध्यमांच्या कॅमेऱयांनी टिपले होते.