|Sunday, April 21, 2019
You are here: Home » Top News » पाकच्या कुरापती सुरूच, एक भारतीय जवान शहीद

पाकच्या कुरापती सुरूच, एक भारतीय जवान शहीद 

ऑनलाईन टीम / श्रीनगर :

संपूर्ण देशभरात होळी मोठ्या उत्साहात साजरी होत असताना दुसरीकडे सीमेवर भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव कायम आहे. होळीच्या दिवशी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या सैन्याकडून गोळीबारी करण्यात येत आहे.

या गोळीबारीत भारताचा एक जवान शहीद झाला आहे. तर दुसरीकडे बारामूला, सोपोर आणि बांदीपुरा या भागात दहशतवाद्यांकडून सुरक्षा यंत्रणांना लक्ष्य केले आहे. सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. सोपोर येथे दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.उत्तर काश्मीरच्या सोपोरमधील रफियाबाद याठिकाणी दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. सुरक्षा यंत्रणाचे या परिसरात शोधमोहीम सुरु असताना दहशतवाद्यांकडून हा हल्ला करण्यात आला. या ग्रेनेड हल्ल्यात कोणतीही जिवीतहानी हानी झाली नसली तरी 3 पोलीस कर्मचारी जखमी झालेत. या हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात सुरक्षा यंत्रणा वाढविण्यात आली आहे. अजूनही या भागात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती पोलिसांनी मिळाली आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा आणि पोलिस या परिसराची छाननी करत आहे.

 

Related posts: