|Monday, June 24, 2019
You are here: Home » Top News » मोहिते-पाटलांनाच उमेदवारी देणार होतो, पण फोन बंद होता : अजित पवार

मोहिते-पाटलांनाच उमेदवारी देणार होतो, पण फोन बंद होता : अजित पवार 

ऑनलाईन टीम / पुणे :

माढा लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार विजय सिंह मोहिते पाटील यांनाच पुन्हा उमेदवारी दिली होती. विजयसिंह मोहिते पाटील हे ज्येष्ठ असून लोकसभेत त्यांची गरज आहे. त्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह पक्षाच्या ज्येष्ठ संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु, त्यांनी फोन स्विच ऑफ ठेवत आपला निर्णय घेतला, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शुक्रवारी केला. सुजय विखे यांनाही दक्षिण नगरमधून आम्ही उमेदवारी देण्यास तयार होतो, पण माशी कुठे शिंकली ते माहिती नाही, असेही त्यांनी नमूद केले.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.  आपली राज्यसभेची मुदत शिल्लक असल्याने माढा लोकसभा मतदार संघातून विजयसिंह मोहिते पाटील यांनी लढावे, असे शरद पवारांनी स्पष्ट केले होते. मात्र विजयसिंहानी वेगळय़ा नावाचा आग्रह धरला. पण माळशिरस वगळता इतर विधनसभा मतदारसंघाच्या आमदारांचा विरोध होता. विजयसिंह मोहिते-पाटील हे ज्येष्ठ असल्याने त्यांची लोकसभेत गरज होती. मात्र फोन स्विच ऑफ ठेवत त्यांनी आपला निर्णय घेतला.