|Monday, June 24, 2019
You are here: Home » Top News » विखे , माहिते पाठोपाठ आता हर्षवर्धन पाटील भाजपचा वाटेवर ?

विखे , माहिते पाठोपाठ आता हर्षवर्धन पाटील भाजपचा वाटेवर ? 

ऑनलाईन टीम / मुंबई :

सुजय विखे, रणजीतसिंह मोहिते पाटलांनंतर आता काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील भाजपच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यातील मोठय़ा राजकीय घराण्यांना भाजपात घेऊन मोठे धक्के दिल्यानंतर आता आणखी एक मोठा धक्का काँग्रेसला बसण्याची शक्मयता आहे. कारण काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील भाजपच्या वाटेवर आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

 

हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्मयता असून त्यांना बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या विरोधत लढण्यासाठी गळ घातली जात असल्याची माहिती आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून स्वतः हर्षवर्धन किंवा त्यांच्या पत्नी भाजपच्या उमेदवार असू शकतात. अजित पवार यांनी आघाडीत बिघाडी झाली तरी चालेल पण इंदापूरमधून दत्तात्रय भरणे हेच लढणार अशी भूमिका घेतल्यापासून हर्षवर्धन पाटील अस्वस्थ आहेत.