|Monday, June 24, 2019
You are here: Home » Top News » मतांसाठी घडवला पुलवामा हल्ला : राम गोपाल यादव

मतांसाठी घडवला पुलवामा हल्ला : राम गोपाल यादव 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पुलवामा दहशतवादी हल्ल्यासंदर्भात समाजवादी पक्षाचे नेते राम गोपाल यादव यांनी वादग्रस्त विधन केले आहे. पुलवामा दहशतवादी हल्ला हा कट असून, मतांसाठी हा हल्ला घडवण्यात आला, असे खळबळजनक विधान यादव यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे. ’अर्धसैनिक दल सरकारवर नाराज आहे. मतांसाठीच जवानांना मारण्यात आले आहे. जम्मू आणि श्रीनगरदरम्यान कोणतीही तपासणी करण्यात आली नाही. तसेच सामान्य बसगाडय़ांमध्ये जवानांना पाठण्यात आले. हा एक कट होता. आता यावर मी अधिक काही बोलत नाही, मात्र केंद्रातील सरकार बदलल्यानंतर याची चौकशी केली जाईल, असे यादव पुढे म्हणाले.

 

पुलवामा दहशतवादी हल्याबाबत समाजवादी पक्षाचे महासचिव राम गोपाल यादव यांच्या या विधानमुळे पक्षासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात असे म्हटले जात आहे. यादव यांच्यापूर्वी काँग्रेसचे नेते बी. के. हरिप्रसाद यांनी देखील पुलवामा हल्ल्याबाबत अशाच प्रकारचे विधन केले होते. पंतप्रधन नरेंद्र मोदी आणि पाक पंतप्रधन इम्रान खान यांच्या संगनमताने हा हल्ला झाला असे हरिप्रसाद यांनी म्हटले होते.