|Monday, June 24, 2019
You are here: Home » Top News » कर्नाटकात क्रूझर आणि कंटेनरची भीषण धडक, 9 जणांचा मृत्यू

कर्नाटकात क्रूझर आणि कंटेनरची भीषण धडक, 9 जणांचा मृत्यू 

ऑनलाईन टीम /  विजापूर :

कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यात गोव्याहून परतणाऱ्या पर्यटकांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. शुक्रवारी (22 मार्च) सकाळी हा अपघात झाला. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. सिंदगी परिसरातील ही घटना आहे. क्रूझर आणि कंटेनरची जोरदार धडक होऊन हा भीषण अपघात झाला.

शुक्रवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात क्रूझरमधील नऊ प्रवाशांचा जागीच मृत्यूझाला. तर पाच जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  20 ते 30 वयोगटातील तरुणांचा मृतांमध्ये समावेश आहे. मृत्युमुखी पडलेले पर्यटक हे कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील रहिवासी होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.