|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » leadingnews » काश्मीरमध्ये 24 तासांत 4 एन्काऊंटर; टॉप कमांडर अलीसह 5 दहशतवादी ठार

काश्मीरमध्ये 24 तासांत 4 एन्काऊंटर; टॉप कमांडर अलीसह 5 दहशतवादी ठार 

ऑनलाईन टीम / श्रीनगर :

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या 24 तासांमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चार चकमकी झाल्या आहेत. यातील एक चकमक शोपिया जिल्ह्यातल्या इमाम भागात अजूनही सुरू आहे. या ठिकाणी एका घरात दोन-तीन दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली आहे. तर बांदिपोरातल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाच्या 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यामध्ये लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर अली भाईचा समावेश आहे. तो मूळचा पाकिस्तानचा रहिवासी होता. 

बारामुल्ला जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. तर शोपिया जिल्ह्यात एका दहशतवाद्याला ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आलं. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या 24 तासांमध्ये झालेल्या चार चकमकींमध्ये आतापर्यंत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं गेलं आहे. या कारवाईत एका अधिकाऱ्यासह तीन जवान जखमी झाले. बारामुल्लातील कलंतरा भागात दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्याची माहिती सुरक्षा दलाचे प्रवक्ते राजेश कालिया यांनी दिली. अद्याप चकमक सुरू असून यात एक अधिकारी आणि दोन जवान जखमी झाल्याची माहिती त्यांनी दिली.