|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » Top News » काँग्रेस नेत्यांनी पाकिस्तान राष्ट्रीय दिवस साजरा करण्यास सुरूवात केली आहे : नरेंद्र मोदी

काँग्रेस नेत्यांनी पाकिस्तान राष्ट्रीय दिवस साजरा करण्यास सुरूवात केली आहे : नरेंद्र मोदी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

काँग्रेसचे ओव्हरसीज अध्यक्ष आणि गांधी परिवाराचे निकटवर्तीय सॅम पित्रोदा यांनी एअर स्ट्राईकबाबत वादग्रस्त विधन केल्यानंतर पंतप्रधन नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला आहे. मोदींनी काँग्रेसवर पलटवार करत म्हटले आहे की, काँग्रेस नेत्यांनी आता ‘पाकिस्तान राष्ट्रीय दिवस’ साजरा करण्यास सुरुवात केली आहे.

  भारतात पुलवामासारखे हल्ले होतातच, त्यामुळे संपूर्ण पाकिस्तानला जबाबदार धरत पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करणे चुकीचे आहे, असे मत काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी व्यक्त केले आहे. त्यावरुन मोदींनी पित्रोदा याच्यावर टीका करण्यास सुरुवात केले आहे. मोदींनी म्हटले आहे की, विरोधकांनी पुन्हा एकदा भारतीय जवानांचा अपमान केला आहे. 130 कोटी भारतीय जनतेने काँग्रेसला जाब विचारायला हवा. मोदी एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी एक ट्वीट करत म्हटले आहे की, काँग्रेस नेत्यांनी पाकिस्तानचा राष्ट्रीय दिवस साजरा करण्यास सुरुवात केली आहे.