|Monday, April 22, 2019
You are here: Home » Top News » भारती पवार यांचा भाजपात प्रवेश तर प्रवीण छेडांची घरवापसी

भारती पवार यांचा भाजपात प्रवेश तर प्रवीण छेडांची घरवापसी 

ऑनलाईन टीम / मुंबई :

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा भारती पवार यांनी भाजपात प्रवेश केला आहे पवार दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून त्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत असे समजते आहे. तर दुसरीकडे भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेले प्रवीण छेडा यांनी पुन्हा भाजपात घरवापसी केली आहे.

   राष्ट्रवादीने ऐनवेळी आलेल्यांना उमेदवारी न दिल्याने भारती पवार नाराज झाल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपामध्ये प्रवेश करून दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून त्या लढण्यास इच्छुक आहेत असेही समजते आहे. सुजय विखे पाटील, रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्यासह आता उत्तर महाराष्ट्रातील पवार घराण्याच्या सुनबाई म्हणजेच भारती पवार या आता भाजपात प्रवेश करणार आहेत.

 

Related posts: