|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » Top News » वाढत्या वयामुळे अडवाणींना तिकीट दिले नाही : नितीन गडकरी

वाढत्या वयामुळे अडवाणींना तिकीट दिले नाही : नितीन गडकरी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

लोकसभा निवडणुकीसाठी काल भारतीय जनता पक्षाची 184 उमेदवारांची यादी घोषित करण्यात आली. यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या जागी भाजप अध्यक्ष अमित शाह यांना उमेदवारी देत अडवाणींचा पत्ता कट केला आहे.

   मात्र अडवाणींचे तिकीट कापले नसल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. अडवाणी यांचे तिकीट कापलेले नाही, तर त्यांचे वाढते वय आणि तब्येतीच्या कारणांमुळे संसदीय बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. अडवाणी आमचे प्रेरणास्थान आहेत, असे गडकरी यांनी म्हटले आहे. अटलजी आणि आडवाणी आमचे प्रेरणास्रोत आहेत. कोणत्याही पक्षात परिवर्तन होते. याचा अर्थ तिकीट कारल्याचा संबंध त्यांच्या योगदानाही होऊ शकत नाही. त्यांच्याबद्दल पक्षातील प्रत्येकाच्या मनात सन्मान आहे, असेही ते म्हणाले. यावेळी गडकरी म्हणाले की, नागपुरातून यावेळी 4 लाखापेक्षा जास्त मतांनी जिंकू, नागपुरात आम्ही खूप कामे केली आहेत. मी नागपुरात वैयक्तिकरित्या 50 हजार लोकांना ओळखतो, असेही ते म्हणाले.