|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » परप्रांतीय टेम्पो ट्रव्हरलचे अतिक्रमण

परप्रांतीय टेम्पो ट्रव्हरलचे अतिक्रमण 

स्थानिक टेम्पो ट्रव्हलर संघटनेची ‘आरटीओ’त धडक

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

सिंधुदुर्ग जिल्हय़ातील टेम्पो ट्रव्हलर चालक-मालकांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात शुक्रवारी धडक देत जिल्हय़ात राज्याबाहेरून येऊन बेकायदेशीरपणे टेम्पो टॅव्हलरने प्रवासी वाहतूक करणाऱयांवर कारवाई करण्याची मागणी केली. बेकायदा व्यवसाय केल्यामुळे शासनाचा कर बुडत आहे. प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱया स्थानिक टेम्पो टॅव्हलर मालकांचे नुकसान होत असल्याकडेही लक्ष वेधले.

शिवसेना पदाधिकारी तथा जि. प. माजी अध्यक्ष संजय पडते यांच्या नेतृत्वाखाली जिल्हय़ातील टेम्पो ट्रव्हलर चालक-मालक संघाने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक शिंदे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी संघाचे अध्यक्ष श्रीकांत तेली, उपाध्यक्ष दत्ताराम सावंत, सचिव गोपाळ गुडेकर, प्रीतम पांढरे, संदीप हरमलकर यांच्यासह जिल्हय़ातील 52 टेम्पो ट्रव्हलर चालक-मालक उपस्थित होते.

अधिकाऱयांचे संगनमत

पर्यटन जिल्हा म्हणून टॅम्पो ट्रव्हलर चालक-मालक संघटना शासनाचे आवश्यक परवाने घेऊन व्यवसाय करत असून कर भरणा करीत आहेत. असे असताना बेकायदेशीरपणे कोणताही परवाना न घेता महाराष्ट्र राज्याबाहेरील काही परप्रांतीय टेम्पो ट्रव्हलर जिल्हय़ात बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतूक करून शासनाला मिळणारा कोटय़वधीचा कर बुडवत आहेत. या प्रकाराला आरटीओ कार्यालयातील काही जबाबदार अधिकाऱयांचे संगनमत आहे.

आसन क्षमतेचा घोळ?

टेम्पो ट्रव्हलरचे पासिंग करतांना गाडय़ांची क्षमता 17 ते 20 एवढय़ा आसन क्षमतेची इतर जिल्हय़ात व राज्यात नोंद केली जाते. मात्र, सिंधुदुर्गात 9 अधिक 1 आसन क्षमता असल्याचा परवाना दिला जात आहे. हा मनमानीपणा आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी टेम्पो ट्रव्हलर  चालक-मालक संघटनेने केली. यावेळी अधिकारी शिंदे यांनी तक्रारीची दखल घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिले.