|Sunday, April 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » करुळचा पोलीस तपासणी नाका पुन्हा सुरू

करुळचा पोलीस तपासणी नाका पुन्हा सुरू 

वार्ताहर / वैभववाडी:

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणला जोडणाऱया विजयदुर्ग- कोल्हापूर महामार्गावरील घाट पायथ्याशी करुळ येथे असलेला पोलीस तपासणी नाका पुन्हा सुरू करण्यात आला आहे.

महिन्याभरापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जिल्हय़ातील पंधरा पोलीस तपासणी नाके बंद केले होते. यात करुळ नाक्मयाचाही समावेश होता. दरम्यान, लोकसभा निवडणूक जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर करुळ तपासणी नाका पोलीस प्रशासनाने पूर्ववत सुरू केला आहे. या नाक्मयावर दोन पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. हा तपासणी नाका कायमस्वरुपी सुरू ठेवावा, अशी मागणी होत आहे.

Related posts: