|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » Top News » मोदींच्या ‘नॅशनल पाकिस्तान डे’निमित्त शुभेच्छा, विरोधकांकडून टीका, तर भाजपचा औपचारिकता असल्याचा दावा

मोदींच्या ‘नॅशनल पाकिस्तान डे’निमित्त शुभेच्छा, विरोधकांकडून टीका, तर भाजपचा औपचारिकता असल्याचा दावा 

ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :

 भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला राष्ट्रीय पाकिस्तान दिनाच्या (नॅशनल पाकिस्तान डे)शुभेच्छा दिल्याचा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे. इम्रान खान यांनी ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान असेदेखील बोलले जात आहे की, भारताच्या पंतप्रधानांनी इतर देशांच्या राष्ट्रीय दिवसनिमित्त किंवा राष्ट्रीय सणानिमित्त शुभेच्छा देणे हा औपचारिकतेचा भाग आहे. दरम्यान भाजपनेदेखील ही केवळ औपचारिकता असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे पाकिस्तान नॅशनल डेनिमित्त आयोजित सर्व कार्यक्रमांवर भारताने बहिष्कार घातला आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला ‘नॅशनल पाकिस्तान डे’च्या शुभेच्छा दिल्याचा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे. इम्रान खान यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये सांगितले आहे की, नरेंद्र मोदी शुभेच्छा संदेशात म्हणतात, मी नरेंद्र मोदी ‘पाकिस्तान नॅशनल डे’निमित्त पाकिस्तानी जनतेला शुभेच्छा देतो. उपखंडातील जनतेने दहशतवाद आणि हिंसाचारमुक्त वातावरणात लोकशाही, शांतता आणि प्रगतीशील क्षेत्राच्या विकासासाठी एकत्र येऊन काम करण्याची ही योग्य वेळ आहे.”