|Monday, June 24, 2019
You are here: Home » Top News » अब्दुल सत्तार यांचा काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा

अब्दुल सत्तार यांचा काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा 

ऑनलाईन टीम / औरंगाबाद :

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने महाराष्ट्रातील तिसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये 5 नावांची घोषणा करण्यात आली आहे. औरंगाबाद येथून सुभाष झांबड यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली मात्र औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी आग्रही असलेले काँ

ग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी बंड पुकारले आहे. सत्तार यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन औरंगाबादमधून अपक्ष निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे.

 

लोकसभा निवडणुसाठी मागील अनेक महिन्यांपासून मी तयारी करत होतो. काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी गावोगावी फिरलो तर एल्गार यात्रा काढली, कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले इतके करुनही पक्षाने मला डावलले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत मी लढवणार असल्याचे अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले.