|Monday, June 24, 2019
You are here: Home » Top News » असुरक्षिततेची भावना असल्यानेच मोदी माझा द्वेष करतात : राहुल गांधी

असुरक्षिततेची भावना असल्यानेच मोदी माझा द्वेष करतात : राहुल गांधी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

माझ्यावर वैयक्तिक टीका करणे, पप्पू म्हणून चिडवणे हे सगळे भाजपाचा माझ्यावरील क्रोध, राग आणि निराशादायी भावनेतून होत असते. पण त्यांच्या रागाला मी रागानेच उत्तर द्यावं यावर माझा विश्वास नाही. रागाने राग काढू शकत नाही, मी पंतप्रधानांचा आभारी आहे. त्यांनी मला खूप काही शिकवले आहे.

विशेषकरून सहनशीलता. तुम्हाला कोणी शिकविणारा असेल तर तुम्ही त्याचा तिरस्कार कसा करू शकता? पंतप्रधन माझा द्वेष करु शकतात, पण माझ्या हृदयात केवळ त्याच्याबद्दल प्रेम आहे कारण मला माहिती आहे की, मोदींचा माझ्यावरील क्रोध फक्त त्यांच्या स्वतःची असुरक्षिततेची आणि भीतीची भावना असल्यामुळे आहे असा टोला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी याना लगावला आहे

राहुल गांधी यांनी या मुलाखतीत मोदींवर टीकेच लक्ष्य केले आहे. या मुलाखतीत राहुल गांधी यांनी म्हटले की, राजकारणात असलेल्या व्यक्तींनी जनतेस सशक्त करण्यासाठी स्वतःची शक्ती वापरली पाहिजे. विशेषत समाजातील ज्या घटकांचे आवाज दाबले जात आहेत त्यांना सशक्त केले पाहिजे. भविष्यात काँग्रेसचं नेतृत्व करणाऱया युवा पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी नेहमीच आमच्या वरिष्ठ नेत्यांची मदत झाली आहे. राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक पातळीवर संघटना मजबूत करण्यासाठी सर्व नेते प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आमच्या पक्षात कुठेही वरि÷ आणि नवीन पिढीमध्ये संघर्ष नाही असा दावा राहुल गांधी यांनी केला.