|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » Top News » लोकसभेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचा २४-२० चा फॉर्म्युला, इतर जागा मित्र पक्षांना

लोकसभेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचा २४-२० चा फॉर्म्युला, इतर जागा मित्र पक्षांना 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

महाआघाडीच्या पत्रकार परिषदेत अखेर लोकसभेच्या जागांसाठीची घोषणा करण्यात आली आहे. कॉँग्रेस 24 जागांवर तर राष्ट्रवादी 20 जागांवर लोकसभा निवडणूक लढवणार आहे. बहुजन विकास आघाडीला 1 जागा, स्वाभिमानीला 2 जागा तर युवा स्वाभिमानी पक्षाला 1 जागा देण्यात आली आहे. महाआघाडीच्या जागावाटपावर यामुळे आता शिक्कामोर्तब झाले आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. या पत्रकार परिषदेला विरोधी पक्षनेते राधकृष्ण विखे पाटील गैरहजर होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अशोक चव्हाण यांनी ही पत्रकार परिषद घेतली ज्यामध्ये महाआघाडीचे जागावाटप जाहीर करण्यात आले. यावेळी त्यांनी भाजपावर आणि विद्यमान केंद्र आणि राज्य सरकारवरही निशाणा साधला. भाजपा आणि शिवसेना हे धर्मांध पक्ष आहेत त्यांना जनता धडा शिकवल्याशिवाय रहणार नाहीत असे काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. भाजपा आणि इतर पक्षांकडून फोडाफोडीचे राजकारण केले जात आहे असाही आरोप अशोक चव्हाण यांनी केला.

स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, पिपल्स रिपब्लकि पार्टी कवाडे गट, बहुजन विकास आघाडी, युवा स्वाभिमान पार्टी, ऑल इंडिया विमुक्त भटक्मया जाती जमाती, आरपीआय डेमोक्रॅटीक, स्वाभिमानी रिपब्लकि पक्ष, भीमसेना, युनायटेड रिपब्लकि पक्षा, गणराज्य संघ, इंडियन डेमोक्रॅटिक अलायन्स, महाराष्ट्र मुस्लमि संघ, आंबेडकर विचार मंच, महाराष्ट्र परिवर्तन सेना, स्वाभिमान रिपाईं, आरपीआय खरात गट हे सगळे पक्ष महाआघाडीत सहभागी झाले आहेत.