|Monday, June 24, 2019
You are here: Home » Top News » …तर महाराष्ट्रात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही – नितीन गडकरी

…तर महाराष्ट्रात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही – नितीन गडकरी 

ऑनलाईन टीम / नागपूर :

लोकांना स्वप्ने दाखविणे खूप सोपे आहे, जनता खूश होते, मात्र ही स्वप्ने पूर्ण न केल्यास जनता नाराज होते असे सांगत भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भविष्यात महाराष्ट्रात एकही शेतकरी आत्महत्या करणार नसल्याचा दावा केला आहे.

यावेळी गडकरी यांनी नागपूरला जगातील सर्वात सुंदर शहर बनविण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच मी आवाक्याबाहेर लोकांना स्वप्ने दाखविली परंतू त्या स्वपनांपेक्षा जास्त कामे केली. स्वप्ने कधी संपत नाहीत. एका मागोमाग एक पडत राहतात. यामुळे लोकांना स्वप्ने दाखविणे खूप सोपे आहे, जनता खूश होते; मात्र ही स्वप्ने पूर्ण न केल्यास जनता नाराज होते असे गडकरी यांनी सांगितले. याचबरोबर महाराष्ट्राला विविध जलसिंचन प्रकल्पांसाठी 1 लाख कोटी रुपये दिले आहेत. 20 हजार कोटी बळीराजा योजना, 50 टक्क्मयांपेक्षा जास्त काम पूर्ण होऊनही बंद पडलेल्या 108 प्रकल्पांना निधी दिला, प्रधानमंत्री सिंचाई प्रकल्प 26 प्रकल्पांना असे मिळून 40 हजार कोटी दिले आहेत. तर तापी-नार-नर्मदा, दमनगंगा-पिंजर या दोन नद्याजोड प्रकल्पांना 60 हजार कोटींचा निधी दिला आहे. यामुळे गोदावरी डॅम पूर्ण भरेल. यामुळे सह्याद्रीच्या पठारावरून समुद्रात जाणारे पाणी मराठवाड्याला, जायकवाडी धरणाला मिळेल. जायकवाडी 80 टक्के भरणार आहे. यामुळे महाराष्ट्रात जलस्तर वाढेल आणि शेतकऱयांचे उत्पादन 2.5 पटींना वाढणार आहे. महाराष्ट्रामध्ये जलसिंचन 50 टक्क्मयांवर जाईल तेव्हा एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, असा दावा गडकरी यांनी केला.