|Monday, June 24, 2019
You are here: Home » Top News » तुमकुरच्या जागेवरून काँग्रेस-जेडीएसमध्ये जुंपली ; देवेगौडांविरोधात खासदाराचे बंड

तुमकुरच्या जागेवरून काँग्रेस-जेडीएसमध्ये जुंपली ; देवेगौडांविरोधात खासदाराचे बंड 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली  :

कर्नाटकमध्ये जेडीएस, काँग्रेसमध्ये महाआघाडी झाली असून जेडीएसने तुमकुर मतदारसंघातून माजी पंतप्रधन एच डी देवेगौडा लढणार असल्याची घोषणा केल्याने या जागेवरील काँग्रेसचे विद्यमान खासदार नाराज झाले आहेत. आघाडी म्हणजे काय? सहकार्य काय असते? माझे तिकिट कापून चुकीचे केल्याचा इशाराच त्यांनी दिला आहे.

     28 लोकसभा मतदारसंघ असलेल्या कर्नाटकमध्ये 20 जागा काँग्रेस आणि 8 जागा जेडीएस लढणार आहे. आधीच विधनसभेतील मंत्रीमंडळ विस्तारावरून काँग्रेसमध्ये नाराजी आहे. तसेच सत्ता गमवावी लागल्याने काँग्रेसचे वरि÷ नेतेही मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना काम करू देत नसल्याचा आरोप होत आहे. यामुळे विद्यमान खासदाराचे तिकिट कापून माजी पंतप्रधन एच डी देवेगौडांना जागा देणे काँग्रेसला धोक्मयाचे आहे. तुमकूर मतदारसंघातून काँग्रेसचे मुद्दहनुमेगौडा खासदार आहेत. तर जेडीएसचे प्रवक्ते रमेश बाबू यांनी एच डी देवेगौडा तुमकुर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे मुद्दहनुमेगौडा नाराज झाले असून आघाडी म्हणजे काय? सहकार्य काय असते? मी तुमकुरचा विद्यमान खासदार आहे आणि मी चांगले योगदान दिले आहे. तरीही माझे तिकिट कसे कापले जाते? हे योग्य नाही, अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.