|Monday, June 24, 2019
You are here: Home » Top News » बेगुसरायमध्ये रंगणार गिरीराज – कन्हैय्या सामना रंगणार

बेगुसरायमध्ये रंगणार गिरीराज – कन्हैय्या सामना रंगणार 

ऑनलाईन टीम / पाटणा :

काही आठवडय़ांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. विविध पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर होऊ लागल्या आहेत. बिहारमधील बेगुसराय मतदारसंघात केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह आणि जेएनयूचा विद्यार्थी सेनेचा माजी अध्यक्ष आणि युवा नेता कन्हैय्या कुमार यांच्यातील लढत रंगण्याची चिन्ह आहेत.

भारतीय जनता पक्षाकडून केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह यांना बेगुसराय येथून उमेदवारी जाहीर झाली आहे. तर कन्हैय्या कुमार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या तिकिटावर याच मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. तसे पाहता गिरीराज सिंह नवादा या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक होते. मात्र, बेगुसरायमधील त्यांची प्रतिमा आणि जातीय समीकरण लक्षात घेऊन सिंह यांना या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थी नेता म्हणून समोर आलेल्या कन्हैय्या कुमारने अल्पावधीच देशभरात आपली प्रतिमा तयार केली आहे. याचा वापर भाजपविरोधात नक्कीच केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कन्हैय्या कुमारला महागठबंधनचा पाठिंबा मिळाला, तर भाजपसाठी ही जागा राखणं अधिक आव्हानात्मक आणि कठीण होणार आहे. गेल्या काही काळापासून कन्हैय्याने अनेकदा भाजपवर निशाणा साधला आहे. तर राजद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक झाल्यानंतर पंतप्रधान मोदींवरही त्याने अनेकदा टीका केली आहे. त्यामुळे मतदार कुणाला कौल देतात, हे पाहणे औत्सुक्मयाचे ठरणार आहे.