|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » Top News » आचारसंहितेत ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपट प्रदर्शित न करण्याचा मनसेचा इशारा

आचारसंहितेत ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपट प्रदर्शित न करण्याचा मनसेचा इशारा 

ऑनलाईन टीम / मुंबई :

लोकसभा निवडणूक काळात प्रदर्शित होणाऱया ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाला मनसेने विरोध केला आहे. लोकसभा निवडणुकांसाठी देशात आचारसंहिता लागू असताना हा सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेने घेतला आहे. तसेच सिनेमा प्रदर्शित झाल्यास मनसे स्टाईनने खळ्ळखट्याक करणार असल्याचा इशाराही महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेने दिला आहे.

समाजातील किंवा सिनेक्षेत्रातील प्रति÷ित लोक मोदी यांच्यावरील सिनेमासाठी आपलं योगदान देत आहेत, असा एक समज या सिनेमाच्या ‘पडद्यामागील’ लोकांना जाणीवपूर्वक पसरवायचा आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना या गलिच्छ प्रचाराचा जाहीर निषेध करते. हा सिनेमा 5 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे पालन सर्वांनी करावे, असे अपेक्षित असताना सत्ताधारी पक्षच जर आचारसंहितेला असा पायदळी तुडवणार असेल तर हा गैरप्रकार रोखण्यासाठी मनसेलाच खळ्ळखट्याक करावे लागेल, असा इशारा मनसे उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला आहे.