|Monday, June 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » आत्मविश्वासाने प्रसंगांना सामेरे गेल्यास जीवन यशस्वी

आत्मविश्वासाने प्रसंगांना सामेरे गेल्यास जीवन यशस्वी 

ज्येष्ठ नागरीक स्नेहसंम्मेलन प्रसंगी प.पू. स्वामी स्वरूपानंद यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी/ इचलकरंजी

मनुष्याने जीवनात येणाऱया प्रत्येक प्रसंगाला जिद्द आणि आत्मविश्वासाने सामेरे गेल्यास जीवन नक्की यशस्वी होते. असे प्रतिपादन प.पू. फुलगाव पुणे येथील स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केले. येथील रोटरी क्लब, प्रोबस क्लब व प्रोबस महिला क्लब यांच्या वतीने ज्येष्ट नागरीकांचे स्नेहसंम्मेलन आयोजित केले होते, त्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

सध्या मानवाचे जीवन ताण तणावाने ग्रासलेले आहे, त्यामुळे तो हसणे हरवून गेला आहे. भूतकाळ व भविष्यकाळाच्या कल्पनेत जगण्याचा खरा आनंद मिळतो. केवळ शरीराने सुदृढ असून चालणार नाही तर मनानेही खंबीर असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले. कार्यक्रमाचे अध्यक्ष रोटरी प्रांतपाल रविकिरण कुलकर्णी यांनी नव्या पीढीवर आपले विचार लादण्यापेक्षा त्यांना योग्य मार्गदर्शन संधी देण्याची गरज असल्याचे सांगीतले. सम्मेलनाच्या दुसऱया सत्रात मानदेश फौंडेशन, म्हसवडच्या डॉ. चेतना सिन्हा यांचे व्याख्यान झाले. त्यानंतर पद्मश्री पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा मान्यवरांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात उपसिथत मान्यवरांचे स्वागत रोटरी क्लबचे अध्यक्ष मुकेश जैन यांनी केले. महेंद्र मुथा यांनी प्रास्ताविक केले. विठ्ठल डाके यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. यावेळी माजी खेळाडू इकबाल मैंदर्गी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मनिष मुनोत यांनी केले. प्रकाश रावळ यांनी आभार मानले. या कार्यक्रमास दलीप शेंडे, कु. राधा मंगेशकर, रविंद्र सौंदत्तीकर, दीपक निगुंडगेकर, प्रोबसचे अध्यक्ष आत्माराम ढवळे, दत्तात्रय साळुंखे, अर्चना बनसोडे, विजया रिसवडे, अमर डोंगरे, बाबासो देवनाळ, अलका रावळ, पुष्पा धूत यांचेसह ज्येष्ठ नागरीक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.