|Monday, June 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » धरणग्रस्तांचा बामणोलीत ठिय्या

धरणग्रस्तांचा बामणोलीत ठिय्या 

प्रतिनिधी/ मेढा

आपल्या विविध मागण्यांसाठी जावली तसेच महाबळेश्वर तालुक्यातील 74 गावातील कोयना धरणग्रस्त गेली तीस दिवस बामणोली येथील मंदिरासमोर ठिय्या आंदोलनाला बसले असून श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आपल्या मागण्या मान्य झाल्याचे या आंदोलन कर्त्यांना सांगितले.

कोयना धरण होऊन अनेक वर्षे लोटली तरी धरणग्रस्तांना अजून न्याय मिळाला नाही. गेली तीस वर्षे श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली जावली, महाबळेश्वर तालुक्यातील धरणग्रस्त आपल्या मागण्यांसाठी लढा देत आहेत. 12 फेब्रुवारीपासून बामणोली येथे धरणग्रस्तांनी ठिय्या आंदोलन सुरू केले होते. 74 गावातील शेकडो धरणग्रस्त ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते.

या धरणग्रस्तांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात बैठक झाली. त्या बैठकीत धरणग्रस्तांना पाच एकर जमीन व ती कसण्यासाठी पाणी मिळणार आहे. जावली, महाबळेश्वर तालुक्यात शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्यात येतील व याबरोबरच अनेक मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्याचे डॉ. पाटणकर यांनी सांगितले. तसेच या भागातील धरणग्रस्तांनी जमिनी विकू नयेत, असे आवाहनही केले.

कोयना धरण झाले तेव्हा पुनवर्सन कायदा लागू नव्हता. तो आम्ही श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यमातून लागू करून घेतला. हेच आंदोलनाचे मोठे यश असल्याचेही डॉ. पाटणकर म्हणाले. या धरणग्रस्थांचे काहीच रेकॉर्ड उपलब्ध नव्हते. जावली, महाबळेश्वर, पाटण तालुक्यातील धरणग्रस्तांचे हे रेकॉर्ड आंदोलनाच्या माध्यमातून तया झाले आर्हें. आता जे निर्णय झालेत, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्हाला झगडावे लागेल असे, डॉ. पाटणकर म्हणाले.

या आंदोलनात श्रमिक मुक्ती दलाचे जावली, महाबळेश्वर अध्यक्ष प्रकाश साळुंखे, हरीबा संकपाळ, हरिश्चंद्र दळवी, नामदेव उतेकर, भगवान भोसले, गंगाराम संकपाळ, पांडुरंग गोरे, श्रीरंग शिंदे, बबन कदम, आर. डी. भोसले, गोविंद सिंदकर, सदाभाऊ सिंदकर, आनंदा कांबळे, राजू सावंत, चंद्रकांत भालेराव, सुधाकर मोरे, चंद्रकांत संकपाळ आदी व धरणग्रस्त मोठय़ा संख्येने उपस्थित होते.