|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शहर परिसरात शिवजयंती साजरी

शहर परिसरात शिवजयंती साजरी 

बेळगाव / प्रतिनिधी

फाल्गुन वद्य तृतीयेला हिंदू तिथीप्रमाणे शनिवारी शहर व परिसरात शिवजयंती साजरी करण्यात आली. ‘जय भवानी जय शिवाजी’च्या गजरात शिवप्रति÷ान बेळगावतर्फे शिवाजी उद्यान येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. प्रतिवषी शिवप्रति÷ानचे कार्यकर्ते हिंदू तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करीत असतात.

शिवरायांच्या पुतळय़ाला अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर विधिवत पूजन करून आरती म्हणण्यात आली. महिलांनी पारंपरिक पद्धतीने पाळणा गायिला. जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांनी पूजन केले. शिवप्रभू दौडमधील प्रथम आलेला सचिन बाळेकुंद्री याचबरोबर राजू तुळजाई, प्रकाश हरजी, ओंकार गवळी व ज्ये÷ धारकरी विठ्ठल लाड यांचा सत्कार करण्यात आला. सुवर्ण सिंहासनासाठी उदित रेगे, विवेक नाईक, आदित्य पाटील, राजू वरपे, सुनील बोकडे यांनी कर्तव्यनिधी म्हणून प्रत्येकी एक हजार एकशे अकरा रुपये शिवप्रति÷ानकडे सुपूर्द केले.

रविवार दि. 24 रोजी सकाळी 11 वा. धर्मवीर संभाजी चौक येथून शिवज्योत सांगलीला निघणार आहे. ही शिवज्योत सांगलीवरून सोमवारी सकाळी 7 वा. बेळगावमध्ये येणार आहे. त्यावेळी ज्योतीचे स्वागत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन किरण गावडे यांनी केले आहे.

यावेळी शहर प्रमुख अजित जाधव, शहर कार्यवाहक विश्वनाथ पाटील, तालुका प्रमुख परशुराम कोकितकर, तालुका प्रमुख कल्लाप्पा पाटील, विभाग प्रमुख आनंद चौगुले, चंद्रशेखर चौगुले, किरण बडवाण्णाचे, अंकुश केसरकर, अभिजीत अष्टेकर, गजानन पाटील, नामदेव पिसे, विजय कुंटे, आनंद कांबळे, प्रमोद कंग्राळकर, अमोल केसरकर, गजानन निलजकर, विजय कोकितकर, शिवाजी गौंडाडकर, अर्जुन गौंडाडकर यांसह शिवप्रति÷ानचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

शिवसेनेतर्फे जयंती

बेळगाव जिल्हा शिवसेनेच्यावतीने शिवाजी उद्यान येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. जिल्हाध्यक्ष प्रकाश शिरोळकर यांनी शिवपुतळय़ाचे पूजन केले. यावेळी उपजिल्हा प्रमुख सुनील पाटील, तालुका प्रमुख सचिन गोरले, शहर प्रमुख दिलीप बैलुरकर, महेश टंकसाळी, तानाजी पावशे, विजय मुरकुटे, प्रवीण तेजम, प्रकाश राऊत, राजकुमार बोकडे, राजू तुडयेकर, पिराजी शिंदे, बाळासाहेब डंगरले यांच्यासह शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

शिवसेना सीमाभागतर्फे शिवजयंती

शिवसेना सीमाभाग (बेळगाव) यांच्यावतीने हिंदु तिथीप्रमाणे शनिवारी शिवाजी उद्यान येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. उपजिल्हा प्रमुख बंडू केरवाडकर यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाचे पूजन करण्यात आले. यावेळी उपशहर प्रमुख राहुल भोसले, मयुरेश काकतकर, बबन लोहार, विजय गवाणे, विनायक अर्कसाली, प्रकाश भोसले, भरत जाधव, प्रियाळ काळे, चंदू कांगे, ओमकार तिलकर यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.