|Sunday, April 21, 2019
You are here: Home » Top News » वाळू खोदकाम करताना ढीग अंगावर कोसळला, ढिगाऱयाखाली दबल्याने दोन युवक मृत

वाळू खोदकाम करताना ढीग अंगावर कोसळला, ढिगाऱयाखाली दबल्याने दोन युवक मृत 

ऑनलाईन टीम / जालना :

जालना जिह्यातील भोकरदन तालुक्यातील गोकुळ गावात वाळूच्या ढिगाऱयाखाली दबून दोन युवकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. योगेश तराळ आणि अनिकेत तराळ अशी या युवकांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री 10 च्या सुमारास केळना नदी पात्रात ट्रक्टर मध्ये वाळू भरताना वाळूच्या ढिगाऱयाजवळ खोदकाम करताना वाळूचा ढीग अंगावर कोसळला. हा ढिगारा कोसळल्याने हे दोघेही युवक त्या ढिगाऱयाखाली खाली दबले. दरम्यान गावकऱयांना ही माहिती कळताच त्यांनी या युवकांना ढिगाऱयाखालून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यापूर्वीच या युवकांचा वाळूखाली दबल्याने गुदमरून मृत्यू झाला. दरम्यान या भागात अवैध वाळू उपशाबाबत नेहमी तक्रारी केल्या जात असताना प्रशासनाच्या दिरंगाईमुळे आणि दुर्लक्षामुळे मोठा गोरखधंदा सुरु आहे. त्यातच या दुर्दैवी घटनेमुळे गावकऱयांनी संताप व्यक्त केला आहे.

Related posts: