|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » वडगाव-शहापूरमध्ये आज रंगपंचमी

वडगाव-शहापूरमध्ये आज रंगपंचमी 

बेळगाव / प्रतिनिधी

वडगाव, खासबाग, शहापूर परिसरात सोमवारी रंगोत्सव साजरा होणार आहे. हा उत्सव शांततेत पार पडण्यासाठी शहापूर पोलीसस्थानक कार्यक्षेत्रात येणाऱया भागात  मद्यविक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. सोमवार दि. 25 रोजी सकाळी 6 पासून मध्यरात्री 12 पर्यंत मद्यविक्रीवर निर्बंध राहणार आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हा आदेश बजावण्यात आला आहे.

या आदेशान्वये शहापूर पोलीसस्थानक कार्यक्षेत्रात येणारी मद्यविक्रीची सर्व दुकाने, बार, क्लबमधील मद्यविक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱयांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. वडगाव, खासबाग आणि शहापूरच्या काही भागात दरवषी होळीच्या पाचव्या दिवशी रंगोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. यंदाही या भागात रंगाचा हा उत्सव मोठय़ा प्रमाणात साजरा होणार आहे. दरम्यान, रंगपंचमी शांततेत पार पाडावी तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सोमवारी या परिसरातील मद्यविक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.