|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » गौड सारस्वत महिला मंडळातर्फे नेत्रदानाचा संकल्प

गौड सारस्वत महिला मंडळातर्फे नेत्रदानाचा संकल्प 

प्रतिनिधी/ बेळगाव

नेत्रदानाचा संकल्प करून गौड सारस्वत महिला मंडळाने आपला महिलादिन साजरा केला. कवळेमठ येथे शनिवारी झालेल्या या कार्यक्रमावेळी महिलांनी विविध खेळाचा आनंद लुटला. परंतु त्याचवेळी सामाजिक बांधिलकी जपत नेत्रदानाचा संकल्पही केला. 20 हून अधिक महिलांनी आणि त्यांच्या पतींनी नेत्रदानाचे अर्ज भरून दिले. तत्पर्वी महिलांनी फॅशन शो आणि अन्य मनोरंजक स्पर्धा घेतल्या.

फॅशन शोमध्ये उषा कामत, अपर्णा कामत, ग्रिष्मा आरोसकर आणि संध्या सडेकर यांनी बक्षिसे मिळविली. परीक्षक म्हणून भावना शिरवईकर यांनी काम पाहिले. रिंगमध्ये गोटय़ा घालणे या स्पर्धेत गिरीजा पावशेकर, संध्या सडेकर व कल्पना शानभाग यांनी बक्षिसे मिळविली. कोबीवर स्ट्रॉ लावणे या स्पर्धेत शुभा गिंडे, माधुरी शानभाग व यशश्री देशपांडे यांनी बक्षिसे मिळविली. क्वॉईन्समध्ये ग्रिष्मा, श्रद्धा कर्नाटकी व मंगल तिळवे यांनी बक्षिसे मिळविली. बौद्धिक स्पर्धेत यशश्री देशपांडे, भावना शिरवईकर व उषा कामत यांनी बक्षिसे मिळविली.

मंडळाच्या अध्यक्षा विनीता नाईक व माधुरी शानभाग यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.