|Thursday, June 27, 2019
You are here: Home » Top News » चौकीदाराच्या पक्षाने स्वत:च्या साईटसाठी आमचा कोड चोरला ; आंध्रातील स्टार्ट-अपचा आरोप

चौकीदाराच्या पक्षाने स्वत:च्या साईटसाठी आमचा कोड चोरला ; आंध्रातील स्टार्ट-अपचा आरोप 

ऑनलाईन टीम / हैदराबाद :

 भारतीय जनता पार्टीने त्यांच्या अधिकृत वेबसाईटसाठी टेम्प्लेट चोरल्याचा आरोप आंध्र प्रदेशातील एका वेब डिझाईन कंपनीने  केला आहे. भाजपाने कोणतेही क्रेडिट न देता टेम्प्लेटची बॅकलिंक काढून टाकल्याचा आरोप डब्ल्यूथ्रीलेआऊट्सने (W3Layouts) केला. भाजपाने टेम्प्लेटसाठी कोणतेही क्रेडिट दिले नाही. उलट त्याची बॅकलिंक मुद्दामहून काढून टाकली, असा दावा कंपनीने केला. 

आपण तयार केलेले टेम्प्लेट भाजपाकडून वापरले जात असल्याचे  पाहिल्यावर कंपनीने ही बाब पक्षाच्या लक्षात आणून दिली. याबद्दल कंपनीने त्यांच्या वेबसाईचवर एक ब्लॉगदेखील प्रसिद्ध केला. ‘भाजपा आयटी सेलने आमचे  टेम्प्लेट वापरल्याने आम्हाला सुरुवातीला फार आनंद झाला. मात्र आमची बॅकलिंक काढून, आम्हाला कोणतेही शुल्क न देता त्यांनी टेम्प्लेटचा वापर केल्याचे  नंतर आमच्या लक्षात आले. त्यांनी आम्हाला कोणतेही क्रेडिट दिले नव्हते,’ असे  कंपनीने ब्लॉगमध्ये म्हटले आहे. झालेला प्रकार आम्ही ट्विटरच्या माध्यमातून भाजपाच्या लक्षात आणून दिला, असे कंपनीने सांगितले. त्यानंतर भाजपाने ज्या ठिकाणी डब्ल्यूथ्रीलेआऊट्सचा उल्लेख होता, तो कोडच डिलीट करण्यात आला, असा आरोप कंपनीने केला. ‘आता त्यांनी कोड पूर्णपणे बदलला आहे. ज्या पक्षाचा नेता स्वत:ला देशाचा चौकीदार म्हणतो, त्या पक्षाकडून करण्यात आलेली ही कृती आमच्यासाठी धक्कादायक आहे. भाजपाकडून चोरी केली जात आहे आणि ती उघड झाल्यानंतरही त्यांना काहीच वाटत नाही,’ अशा शब्दांमध्ये कंपनीकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. कंपनीच्या या ब्लॉगनंतर सोशल मीडियाने भाजपावर जोरदार टीका केली आहे.