|Monday, June 24, 2019
You are here: Home » Top News » पाकिस्तानला कुणी एक शिवी दिली तर मी त्याला दहा शिव्या देईन : काश्मिरी नेता

पाकिस्तानला कुणी एक शिवी दिली तर मी त्याला दहा शिव्या देईन : काश्मिरी नेता 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचाराला वेग आलेला आहे. राजकीय नेत्यांची वादग्रस्त विधनेही सुरु झाली आहेत. जम्मू काश्मीरचे नॅशनल कॉन्फरन्स पार्टीचे नेते मोहम्मद अकबर लोन यांनी पाकिस्तानबद्दल वादग्रस्त विधान केले आहे.

  जम्मू- काश्मीरमधील कुपवाडा येथे सभेत बोलताना अकबर लोन यांचे पाकिस्तानवरील प्रेम उफाळून आले आहे. जर पाकिस्तानला कोणी एक शिवी दिली तर त्याला मी येथून दहा शिव्या देईन. एवढेच म्हणून ते थांबले नाहीत. तर त्यांनी, पाकिस्तान यशस्वी व्हावा, आमची आणि त्यांची दोस्ती वाढावी. त्या दोस्तीचा मी आशिक आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. पाकिस्तान नेहमी खुश रहावा आणि त्याने प्रगती करावी अशा विधनाने अकबर लोन यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.