|Monday, June 24, 2019
You are here: Home » Top News » पालघर नगरपरिषद निवडणुकीत महायुतीला बहुमत, नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे

पालघर नगरपरिषद निवडणुकीत महायुतीला बहुमत, नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे 

ऑनलाईन टीम / पालघर :

पालघर नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला बहुमत मिळालं, मात्र नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचा उमेदवार विराजमान होणार आहे. थेट जनतेतून राष्ट्रवादीच्या उज्ज्वला काळे नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या.

पालघर नगरपरिषदेच्या 14 प्रभागांमधील 28 जागांचे निकाल आज जाहीर करण्यात आले. भाजप-शिवसेना-रिपाइं युतीने बहुमत मिळवत 21 जागा जिंकल्या. राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीला 2, तर अपक्षांना 5 जागा जिंकता आल्या. नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेतर्फे राष्ट्रवादीतून आलेल्या श्वेता मकरंद पाटील, राष्ट्रवादीच्या उज्ज्वला केदार काळे आणि शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या अपक्ष उमेदवार अंजली पाटील रिंगणात होत्या. राष्ट्रवादी-काँग्रेस महाआघाडीच्या उज्ज्वला काळे यांनी 1069 मतांनी विजय मिळवला. पालघर नगरपरिषदेच्या 14 प्रभागांमधील 28 जागांसह एका नगराध्यक्षपदासाठी काल मतदान झालं. दिवसभरात अंदाजे 67 टक्के मतदान झाल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाकडून सांगण्यात आलं. पालघर जिह्याची निर्मिती झाल्यानंतर पहिल्यांदाच पालघर नगरपरिषदेची निवडणूक असल्याने सर्वच राजकीय पक्ष पूर्ण ताकदीनिशी या निवडणुकीत उतरले होते. शिवसेना-भाजप-रिपाइं महायुती, काँग्रेस-राष्ट्रवादी बहुजन विकास आघाडी आणि अपक्ष असा सामना रंगला.