|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » leadingnews » सत्तेत आल्यास गरीब कुटुंबाला दरवर्षी 72 हजार ; राहुल गांधींचा ‘गरिबी हटाव’ नारा

सत्तेत आल्यास गरीब कुटुंबाला दरवर्षी 72 हजार ; राहुल गांधींचा ‘गरिबी हटाव’ नारा 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

काँग्रेसने पुन्हा एकदा ‘गरिबी हटाव’चा नारा दिला आहे. सत्तेस आल्यास प्रत्येक कुटुंबाला दरवषी 72 हजार रुपये देण्याची घोषणा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केली आहे.

देशातील 20 टक्के लोकांना या योजनेचा लाभ मिळेल, असे आश्वासन त्यांनी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ श्रीमंत उद्योगपतींना मदत करतात. मात्र आम्ही गरिबांना मदत करणार आहोत, असे राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत म्हटले. काँग्रेसचे सरकार आल्यावर गरिबांना न्याय मिळेल, असे ते म्हणाले.