|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » वादळी वाऱयासह झालेल्या पावसात

वादळी वाऱयासह झालेल्या पावसात 

प्रतिनिधी/ खानापूर

खानापूर परिसरात सोमवारी सायंकाळी झालेल्या पाऊस व वाऱयामुळे येथील मारुतीनगरमध्ये असलेल्या उर्दू हायस्कूलच्या कार्यालयाचे पत्रे उडून मोठे नुकसान झाले आहे. पत्रे उडाल्यामुळे कार्यालयातील कागदपत्रे, कॉम्प्युटर, झेरॉक्स मशीन आदींचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच ग्रामीण भागातही पावसाने जोराचा तडाखा दिला आहे.

 शहराजवळील कुप्पटगिरी गावाजवळ असलेल्या अरुण होसमणी यांच्या पॉली हाऊसवरचे छत निकामी होऊन त्यांचे जवळजवळ 40 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच यडोगा गावाजवळील सावळेकर यांच्या शेतातील 6 पॉली हाऊसचे पाऊस वाऱयामुळे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्मयातील माणिकवाडी गावातदेखील पाऊस वाऱयामुळे घरावरील पत्रे उडून जाण्याचे प्रकार घडले आहेत. त्याचा विशेष फटका या गावातील ज्ञानेश्वर गावडा व मल्हारी मयेकर यांना बसला आहे. त्या दोघांच्या घरावरील सर्व पत्रे उडून ते 50 ते 60 फुटावर पडले. तर काही पत्रे जवळच्या झाडावर जाऊन अडकले. त्यापैकी काही पत्रे त्यांच्या घराजवळील विठ्ठल मंदिराच्या कळसाला जाऊन आपटल्याने मंदिराचा कळसही जवळपास 50 ते 60 फूट लांब जाऊन पडला. यामध्ये मल्हारी मयेकर व ज्ञानेश्वर गावडा यांचे बरेच नुकसान झाले आहे.