|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पहिल्याच वळीवाने शहराला झोडपले

पहिल्याच वळीवाने शहराला झोडपले 

प्रतिनिधी/ बेळगाव

सोमवारी दुपारी जोरदार वाऱयासह दाखल झालेल्या पावसाने शहरवासियांची तारांबळ उडाली. शहरासह तालुक्मयातही दमदार पावसाने हजेरी लावली. पहिलाच वळिवाचा पाऊस पडल्यामुळे नागरिकांना सुखद धक्का बसला आहे.  गेल्या काही दिवसांपासून उकाडय़ाने हैराण झालेल्या बेळगावकरांना सुखद गारवाही मिळाला. दमदार पावसाच्या प्रारंभी काही ठिकाणी गारांचा वर्षाव झाला.  विजांचा कडकडाटही सुरू होता. त्यानंतर गटारी तुडूंब भरून पाणी रस्त्यांवर वाहत होते. यामुळे पादचाऱयांना व वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली. काही ठिकाणी तर वाहने चिखलात रुतून बसली होती. पावसाने शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.

गेल्या काही दिवसांपासून बेळगाव शहरवासीय विचित्र हवामानाचा अनुभव घेत  होते. शहराचे तापमान सरासरी किमान 36 अंश सेल्सिअसपेक्षाही अधिक झाले होते. यामुळे नागरिक उन्हामुळे त्रस्त झाले होते. सोमवारी सकाळी काहीसे ढगाळ वातावरण निर्माण झाले. मात्र, पाऊस पडेल असे कोणालाच वाटले नव्हते. दुपारी 4 च्या दरम्यान पावसाचा शिडकावा झाला. त्यानंतर 5.30 च्या दरम्यान दमदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे भाजी विपेते, फेरीवाले आणि दुकानदारांची तारांबळ उडाली. वाहन चालकांनाही आडोसा शोधावा लागला.  गटारांमधील पाणी रस्त्यांवरून वाहत होते. यामुळे काही ठिकाणी दुर्गंधी पसरली होती. त्या पाण्यामधून नागरिकांना वाट काढताना कसरत करावी लागत होती.

उन्हाळ्यामुळे पावसासाठीची पूर्वतयारी करण्याचा प्रश्नच नव्हता. यामुळे नागरिकांना भिजावे लागले. मिळेल तेथे आडोसा शोधत अनेकांनी आपला बचाव करून घेतला. दरम्यान, उन्हापासून रक्षणासाठी छत्री घेऊन बाहेर पडलेल्या नागरिकांना मात्र या छत्रीचा पावसापासून संरक्षण करून घेण्यास उपयोग झाला.

गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये खोदाईची कामे सुरू आहेत. केबल घालणे, पाईप घालण्यासाठी चरी खोदण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणी वाहने अडकून पडत होती. त्यामुळे वाहनचालकांना या पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. महात्मा फुले रोड परिसरात अनेक वाहने रुतली होती. त्यामुळे ती बाहेर काढण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली. अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडीही निर्माण झाली होती. †िजल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील एक झाडही कोसळले आहे. सुदैवानेच या घटनेत कोणतेही नुकसान झाले