|Monday, June 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शेतकऱयांचे राष्ट्रीयकृत बँकांमधीलही कर्ज माफ करा

शेतकऱयांचे राष्ट्रीयकृत बँकांमधीलही कर्ज माफ करा 

प्रतिनिधी / बेळगाव

प्राथमिक कृषी पत्तीन सोसायटीमधील कर्ज माफ केल्यानंतर शेतकऱयांचे राष्ट्रीय कृत बँकेमधील मात्र कर्ज माफ करण्यास नकार देण्यात येत आहे. यामुळे शेतकऱयांवर अन्याय होत असून शेतकऱयांची बँकेतील 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करावे, अशी मागणी रयत संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे करण्यात आली आहे.

सरकारने शेतकऱयांचे 1 लाखापर्यंतचे कर्ज माफ केल्याचे जाहीर केले आहे. मात्र प्राथमिक कृषी पत्तीन सोसायटीमधील 10 ते 15 हजार रुपयांचे कर्ज माफ केल्यानंतर त्याच शेतकऱयाचे राष्ट्रीयकृत बँकेमधील 90 हजार कर्ज माफ झाले पाहिजे. पण सोसायटीमधील कर्ज माफ केले म्हणून बँकेतील कर्ज माफ करण्यास नकार देण्यात येत आहे. यामुळे शेतकऱयांवर अन्याय होत असून संपूर्ण कर्ज माफ करावे, अशी मागणी शेतकऱयांनी केली आहे.

अगसगा येथील रेशन दुकानचे सर्व्हर दुरुस्त करा

अगसगा येथील प्राथमिक कृषी पत्तीन सोसायटीच्या रेशन दुकानमधील सर्व्हर डाऊन होत आहे. तेंव्हा ते सर्व्हर तातडीने दुरुस्त करावे, अशी मागणी करण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्यामुळे रेशन कार्डधारकांना रेशनसाठी तीन ते चारवेळा पळापळी करावी लागत आहे. तेंव्हा तातडीने सर्व्हर दुरुस्त करावे, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली. यावेळी परशराम रेडेकर, दुडाप्पा होसपेठ, इराप्पा पाटील, सिद्धअप्पय्या दुदलण्णावर, के. बी. रेडेकर, परशराम बगणळ, नारायण कडोलकर, सुरेश तुबकी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते..