|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » संभाजी ज्वालेचे बेळगावमध्ये स्वागत

संभाजी ज्वालेचे बेळगावमध्ये स्वागत 

बेळगाव  / प्रतिनिधी

वडू बुदुक (जिल्हा सांगली) येथून निघालेली संभाजी ज्वाला सोमवारी सकाळी बेळगावमध्ये दाखल झाली. धर्मवीर संभाजी चौक येथे या ज्वालेचे स्वागत करण्यात आले. स्वागतानंतर ही ज्वाला दर्शनासाठी ताशिलदार गल्ली येथील सोमनाथ मंदिरात ठेवण्यात आली होती.

शिवप्रति÷ानचे कार्यकर्ते रविवारी बेळगावमधून धर्मवीर संभाजी ज्योत आणण्यासाठी सांगलीला गेले होते. वडू बुद्रुक येथून सांगली येथे ही ज्योत आणण्यात आली. त्यानंतर ती बेळगावमध्ये आणण्यात आली. तालुका प्रमुख कल्लाप्पा पाटील, विनायक कोकितकर, जोतिबा, रोहित भादवणकर, सचिन बाळेकुंद्री, राजू तुळजाई, प्रकाश हरजी, ओंकार गवळी हे युवक ज्योत आणण्यासाठी गेले होते.

धर्मवीर संभाजी चौक येथे या ज्योतीचे स्वागत करण्यात आले. जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांनी स्वागत केले. धर्मवीर संभाजी महाराजांची अंत्ययात्रा काढण्यात आली नसल्याने त्यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून 5 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी उद्यान ते धर्मवीर संभाजी चौक या मार्गावर मूक पदयात्रा काढण्यात येणार आहे. यावेळी ही ज्योत प्रज्वलित करण्यात येणार आहे. यावेळी कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

धर्मवीर संभाजी महाराजांच्या आठवणी ताज्या राहण्यासाठी व त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची माहिती मिळावी, यासाठी बलिदान मास पाळण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून ही धर्मवीर ज्योत आणण्यात आली. यावेळी विश्वनाथ पाटील, आनंद चौगुले, प्रमोद चौगुले, अंकुश केसरकर, गजानन निलजकर यांसह मोठय़ा संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.