|Monday, June 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » जिह्यात आठ ठिकाणी गावठी हातभट्टीवर कारवाई

जिह्यात आठ ठिकाणी गावठी हातभट्टीवर कारवाई 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर जिह्यात अवैध दारू व्यवसाय करणाऱयांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत़ त्यानुसार सोमवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने जिह्यात विविध आठ ठिकाणी कारवाई करत 1 लाख 4 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आह़े तसेच याप्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली आह़े

     नितीन बुधाजी पंडय़े (ऱा लोवले, त़ा संगमेश्वर), संतोष सावजी पर्शुराम, व रमेश धोंडू पर्शुराम ( दोन्ही ऱा पर्शुरामवाडी, देवरूख) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत़ यावेळी गावठी हातभट्टी निर्मितीयुक्त रसायनाचा उत्पादन शुल्क कर्मचाऱयांकडून नाश करण्यात आला तर हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली आह़े

   सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी विभागाच्या अधी†िक्षका संध्याराणी देखमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाचे प्रभारी निरिक्षक शंकर जाधव, संजय दळवी, रामचंद्र पुजारी, सुरेश पाटील, दुय्यम निरिक्षक अमित पाडाळकर, नंदकिशोर क्षिरसागर, विशाल सकपाळ, सहाय्यक दुय्यम निरिक्षक विजय हातीसकर, जवान विशाल विचारे, सागर पवार, अतुल वसावे, मलीक धोत्रे, निनाद सुर्वे, हर्षद शेख, ओंकार कांबळे, सागर चव्हाण महिला जवान अनिता डोंगरे यांनी केल़ी

कोतवलीत साडेआठ हजाराचा मद्यसाठा जप्त

खेड तालुक्यातील कोतवली-भोईवाडी येथे गावठी दारूअड्डय़ावर धाड टाकून 8 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल येथील पोलिसांकडून जप्त करण्यात आला.  अनंत उर्फ बंडय़ा कृष्णा जोगळे (रा. कोतवली-भोईवाडी) हा गावठी दारू विकत असल्याची कुणकुण लागताच पोलिसांनी धाड टाकली. यावेळी 150 लिटर गावठी दारू व 1680 रूपये किंमतीच्या 12 बिअरच्या बाटल्यांसह अन्य मुद्देमाल आढळून आला. याप्रकरणी येथील पोलीस स्थानकात बंडय़ावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.