|Sunday, April 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » कर्जाच्या बहाण्याने 12 लाखांचा गंडा घालणाऱयाला मुंबईतून अटक

कर्जाच्या बहाण्याने 12 लाखांचा गंडा घालणाऱयाला मुंबईतून अटक 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

वैयक्तिक कर्ज देण्याच्या बहाण्याने  सुमारे 12 लाख रूपयांचा गंडा घातल्याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आह़े धर्मेश महेंद्र कुंवर (27 ऱा परेल, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आह़े सोमवारी त्याला न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आह़े

  याप्रकरणी ओमकार संतोष चव्हाण (26, ऱा खडपेवठार, रत्नागिरी) यांनी 28 फेबुवारी 2019 रोजी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होत़ी त्यानुसार मुंबईतील संशयित आरोपी विद्या राजकुमार निंबाळकर, धर्मेश कुवर, विनोद विष्णू लोयरे (ऱा सर्व मेहता कंपाऊंड परेल मुंबई) यांनी एक टक्का दराने कर्ज मिळवून देण्याचे आमीष दाखवले होते. त्यासाठी काही रक्कम आगाऊ जमा करावी लागेल अशी बतावणी त्यांनी केली होत़ी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तक्रारदारांनी 22 फेब्रुवारी ते 21 जून 2018 या कालावधीत सुमारे 11 लाख 60 हजार रूपये संशयितांच्या खात्यात जमा केले होत़े

दरम्यान वर्ष होत आले तरी आपल्याला कर्ज न मिळाल्याने फसवणूक झाली असल्याचे तक्रारदार यांच्या लक्षात आल़े याप्रकरणी त्यांनी न्यायालयात आरोपींच्याविरूद्ध दाद मागितली होत़ी त्यानुसार हे प्रकरण शहर पोलिसांकडे पाठविण्यात आल्यानंतर रत्नागिरी शहर पोलिसांनी आरोपिंच्याविरोधात भादवि कलम 420 नुसार गुन्हा दाखल केला होत़ा

Related posts: