|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » आचारसंहिता भंगाचा 10 जणांवर गुन्हा

आचारसंहिता भंगाचा 10 जणांवर गुन्हा 

प्रतिनिधी/ उंब्रज

उंब्रज (ता. कराड) येथील एका हॉटेलवरून जेवण करून घरी जाण्याकरिता निघालेल्या एका युवकास मारहाण करून तीन जणांनी जबरदस्तीने दुचाकी काढून घेतल्याप्रकरणी व निवडणुकीची आचारसंहिता भंग करून मारामारी केल्याप्रकरणी 10 जणांवर उंब्रज पोलिसांत रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. सदरची घटना रविवार दि. 24 रोजी रात्री 11.45 वाजण्याच्या सुमारास घडली.

खंडय़ा उर्फ खंडू प्रल्हाद जाधव, विशाल कुकले, विशाल माने (पूर्ण नावे समजू शकली नाहीत) तिघे रा.उंब्रज ता. कराड यांच्यावर जबरदस्तीने दुचाकी काढून घेतल्या प्रकरणी तर विक्रम जनार्दन नांगरे, महेश सुरेश साठे, गणेश किसन पोळ,  रविराज श्रीधर थोरात, अभिजीत रमेश थोरात, सोन्या साठे सर्व रा. कोर्टी ता. कराड, बंडा उर्फ सागर शंकर गायकवाड (रा.उंब्रज ता.कराड) अशी आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत गणेश किसन पवार (रा. कोर्टी ता. कराड) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, उंब्रज येथील एका हॉटेलवरून जेवण करून दुचाकी क्रमांक एम. एच. 11.ए.वाय.8125 वरून घरी जात असताना वरदराज मंगल कार्यालयासमोर सेवा रोडवर विशाल कुकले, खंडय़ा व विशाल माने या तिघांनी फिर्यादीस अडवून दुचाकीची जबरदस्तीने चावी काढूनही घेऊन मारहाण केली असल्याचे फिर्यादीत नमूद केले असून तीन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या दरम्यान रात्रगस्तीला असणारे उंब्रज पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी गस्त घालत असताना वरदराज मंगल कार्यालयासमोरील सेवा रोडवर बेकायदेशीर जमाव जमवून दोन गटात मारामारी सुरु होती. त्यावेळी पोलिसांनी संबंधितांना मारामारी करु नका असे सांगितले. मात्र पोलिसांना न जुमानता त्यांच्यासमोरच मारामारी सुरू ठेवली. यामध्ये विक्रम नांगरे याच्या डोक्याला मार लागून जखमी झाला. यामध्ये निवडणुकीची आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी तसेच दुचाकीची चावी काढून घेतल्याप्रकरणी 10 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड करीत आहेत. दरम्यान, लोकसभेची आचारसंहिता लागू झालेली आहे. सार्वजनिक ठिकाणी कोणी वाद करून सार्वजनिक शांततेचा भंग करताना आढळून आलेस त्याच्या विरुद्ध कडक कायदेशीर कारवाही करण्यात येणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी सांगितले.