|Sunday, April 21, 2019
You are here: Home » Top News » अमेरिका-मेक्सिकोच्या सीमेवर उभारली जाणार भिंत; पँटॉगॉनकडून एक अब्ज डॉलर मंजूर

अमेरिका-मेक्सिकोच्या सीमेवर उभारली जाणार भिंत; पँटॉगॉनकडून एक अब्ज डॉलर मंजूर 

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन:

अमेरिकेचं संरक्षण कार्यालय असलेल्या पँटॉगॉनने  मेक्सिकोच्या सीमेवर भिंत उभारण्यासाठी एक अब्ज डॉलर मंजूर केले आहेत. मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधणे ही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे. अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारावेळी त्यांनी याबद्दलचे आश्वासन दिले होते. संसदेने भिंत उभारणीसाठी निधी मंजूर न केल्याने काही दिवसांपूर्वी अमेरिकेत अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली होती. विरोधकांनी यावरुन ट्रम्प सरकारला कोंडी पकडल्याने सर्वच खर्चांना मिळणारी मंजुरी रखडली होती. त्यामुळे देशभरातील कर्मचाऱ्यांचे  वेतन थकले होते.

अमेरिकेच्या संरक्षण कार्यालयाचे प्रमुख असलेल्या पॅट्रिक शानाहान यांनी मेक्सिकोच्या सीमेवरील भिंतासाठी एक अब्ज डॉलर देण्यास मंजुरी दिली. अमेरिका-मेक्सिकोच्या सीमेवर 92 किलोमीटरची भिंत उभारली जाणार आहे. ही भिंत 5.5 मीटर उंच असेल. सीमेवर भिंत उभारली जात असताना या भागातील रस्ते सुधारले जातील. याशिवाय पुरेशी प्रकाश व्यवस्था करण्यात येईल.  ‘आर्मी कोअर ऑफ इंजिनियर्सच्या कमांडरना सुरक्षा, सीमाशुल्क विभागाच्या मदतीसाठी एक अब्ज डॉलर्सचा निधी मंजूर करण्यात आला आहे,’ अशी माहिती पँटॉगॉननं प्रसिद्धीपत्रातून देण्यात आली आहे. ‘संघराज्य कायद्यानुसार सीमेवर भिंत उभारली जाऊ शकते. संरक्षण मंत्रालयाला तसा अधिकार आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवरील अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले  आहे,’ असे  पॅट्रिक शानाहान यांनी म्हटले  आहे. 

Related posts: