|Monday, June 17, 2019
You are here: Home » Top News » चौकीदार चोर नव्हे, प्युअर ; पुन्हा पीएम होणे शुअर ; राजनाथ सिंहांची आठवले स्टाईल बॅटिंग

चौकीदार चोर नव्हे, प्युअर ; पुन्हा पीएम होणे शुअर ; राजनाथ सिंहांची आठवले स्टाईल बॅटिंग 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

 भाजपा आणि काँग्रेसमध्ये चौकीदारवरुन चांगलीच जुंपली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी चौकीदार चोर है अशी घोषणा वारंवार केली आहे. त्या टीकेला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. चौकीदार चोर नाही, तर प्युअर आहे, असे सिंह म्हणाले. भाजपाच्या विजय संकल्प रॅलीत भाषण करताना राजनाथ यांनी मोदी पुन्हा पंतप्रधान होतील, असा विश्वास व्यक्त केला. 

‘चौकीदार चोर नहीं, चौकीदार प्युअर है. चौकीदार का दुबारा पीएम बनना शुअर है, देश की समस्याओं का वह ही क्युअर है’, असे राजनाथ सिंह भाजपाच्या रॅलीला संबोधित करताना म्हणाले. राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणावरुन राहुल गांधींनी मोदींवर टीका करताना चौकीदार चोर है, असा आरोप केला होता. त्यानंतर चौकीदार चोर है अशी घोषणा देशभरात गाजली. मोदी स्वत:ला चौकीदार म्हणवून घेतात. मात्र ते स्वत:च चोर आहेत, असा खळबळजनक राहुल गांधींनी केला होता. राहुल गांधींच्या चौकीदार चोर है या टीकेचा भाजपाने सोशल मीडियावरील प्रचारासाठी वापर केला. भाजपाने सोशल मीडियावर ‘मै भी चौकीदार’ कॅम्पेन सुरू केले. मोदींनी ट्विटरवर स्वत:च्या नावापुढे चौकीदार शब्द जोडला. त्यानंतर भाजपाचे केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार आणि नेत्यांनी त्यांच्या नावासमोर चौकीदार शब्द जोडण्यास सुरुवात केली. तोच धागा पकडत राजनाथ यांनी पंतप्रधान मोदींसाठी जोरदार बॅटिंग केली आहे.