|Thursday, June 27, 2019
You are here: Home » उद्योग » रिलायन्स जिओ गीगाफायबर ‘ट्रिपल पे प्लॅन’च्या चाचणी

रिलायन्स जिओ गीगाफायबर ‘ट्रिपल पे प्लॅन’च्या चाचणी 

निवडक शहरांमध्ये राबिवणार योजना : सेवेची अधिकृत घोषणा करणे बाकी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय दूरसंचार क्षेत्रात आपली जिओ डिजिटल क्रांती अशी ओळख निर्माण करणाऱया रिलायन्स कंपनीने रिलायन्स जिओ गीगा फायबरच्या ट्रिपल योजनेच्या चाचणीला सुरुवात करण्यात आल्याचे रिलायन्स जिओकडून सांगण्यात आले आहे.  ग्राहकांसाठी एक महिन्याचा एका पॅकमध्ये गीगाफायबर, जिओ होम टीव्ही आणि जिओ ऍप्स ही सुविधा दिला जाणार आहे. यासाठी कंपनीने काही निवडक शहरांची निवड करत त्याठिकाणी गीगाफायबरची जोडणी करुन देत असल्याचे स्पष्टीकरण करण्यात आले.

रिलायन्स जिओ ‘ट्रिपल पे प्लॅन’ची चाचणी प्रायोगिग पातळीवर आपल्याच कर्मचाऱयांमध्ये कनेक्शन जोडणी करुन पडताळी करण्यास त्यांना डॅशबोर्डवर या सुविधे संदर्भातील फक्त ट्रिपल प्लॅनची निरीक्षणे नोंदवली जात असल्याचे टेलिकॉम टॉकच्या अहवालातून सांगण्यात आले.

28 दिवसांचा प्लॅन

सदर प्लॅन हा 28 दिवसांसाठी दिला जात असून यात अमर्यादित व्हाईस कॉल, 100 जीबीचा डेटा, जिओ होम टीव्ही ऍक्सेससह जिओ ऍप्सची नोंदणी मोफत देण्याची सोय ही या योजनेत दिली आहे. त्यामुळे सध्या कोणत्याही प्रकारची या प्लॅनसाठी किंमत आकारली जात नसून ही योजना योग्य पद्धतीने आगामी काळात राबविण्यासाठी प्रयत्न आतापासून सुरु करण्यात आले असल्याचे स्पष्ट केले आहे.

ध्येय कंपनीचे

कंपनी लवकरच देशातील 1 हजार 110 शहरात आणि पाच कोटी घरात आपली सेवा देणार आहे. यासाठी मागील दोन वर्षांपासून चाचणीची प्रक्रिया सुरु ठेवण्यात आली असल्याचे स्पष्टीकरण रिलायन्स जिओने दिले आहे.

जिओ गीगाफायबर?

रिलायन्स जिओ गीगाफायबर एक एफटीटीएच(फायबर-टू-द-होम) सेवा आहे. यात हाय स्पीड फायबरच्या माध्यमातून फिक्सड लाईन ब्रॉडब्रँण्डचे कनेक्शन ग्राहकांना दिले जाणार असून यामध्ये 1 जीबीपीएस पर्यंत डेटा स्पीड उपलब्ध करुत देण्यात येणार व त्यात सेट-टॉप बॉक्स दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले.