|Monday, June 17, 2019
You are here: Home » उद्योग » ‘रेनॉ’ची क्विड एप्रिलपासून महागणार

‘रेनॉ’ची क्विड एप्रिलपासून महागणार 

नवी दिल्ली :

कार निर्मिती करणाऱय रेनॉकडून एप्रिल महिन्यापासून भारतातील क्विड कारच्या किंमतीत 3 टक्क्यांनी वाढ करणार असल्याची घोषणा केली आहे. सध्या उत्पादन खर्चातील वाढ होत असल्याच्या कारणांमुळे आम्ही वाहनांच्या किंमतीत वाढ करत असल्याचे स्पष्टीकरण कंपनीने दिले आहे. सध्या दिल्लीतील क्विड एक्स शोरुमधील वाहनांच्या किंमती 2.66 लाख ते 4.63 लाख रुपयापर्यंत असून यात एप्रिलपासून वधार करणार असल्याचे सागण्यात आले. हॅचबॅक सेगमेन्ट कारमध्ये 0.8  लिटर आडिग 1 लिटर इंजीन वॅरिएटसोबत विप्री करण्यात येत आहे. यासोबतच मॅन्यूअल आणि ऑटोमेटिक ट्रासमिशन पर्याय ठेवण्यात आला आहे. रेनॉमध्ये क्विडमधील एबीएस आणि ईबीडीसारखी सुरक्षा देणारी फिचर्सची सोय उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

अन्य कंपन्या

टोयोटा किर्लोस्कर आणि जॅग्वार लॅन्ड रोव्हर या कंपन्यांच्या कार्सच्या किंमतीत वाढ करणार असल्याची घोषणा या अगोदरच करण्यात आली आहे. मागील आठवडय़ात टाटा मोटर्सनेही आम्ही प्रवासी वाहनांच्या किंमती 25 हजार पर्यंत वाढविणार असल्याचे म्हटले आहे.